
अमेरिकेने इराणच्या एका लग्न समारंभात हवाई हल्ला केला. या हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू झाला असून 60 जण जखमी झाले आहेत. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने या हल्ल्याचा निषेध केला आहे. अमेरिकेने युद्धाच्या पहिल्याच दिवशी मिनाब येथील मुलींच्या शाळेवर हल्ला केला होता. ज्यामध्ये 160 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता, असे इराणने म्हटले आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध पेटले आहे. लग्न समारंभावर हल्ला झाला आहे. यात वॉशिंग्टनने आणखी विनाशकारी हल्ले करण्याची धमकी दिली आहे. हिंदुस्थानातील इराणी दूतावासाने या नागरिक मृत्यूबद्दल तीव्र संताप व्यक्त करत याला दहशतवादी अमेरिकन लष्कराचे आणखी एक गुन्हेगारी कृत्य म्हटले आहे.
दक्षिण इराणमधील बंदर कुहेस्तक येथील लग्नाच्या समारंभावर अमेरिकन लष्कराने केलेल्या हल्ल्यात किमान पाच लोकांचा मृत्यू झाला असून 60 हून अधिक जण जखमी झाले आहेत. अमेरिकेच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून तेहरानने अधिकृत निवेदनात दावा केला आहे की, त्यांनी जॉर्डन आणि इराकमधील अमेरिकन मालमत्तांवर हल्ले केले आहेत. तसेच बहरीनवरही हल्ला केला आहे.




























































