कोल्हापुरात दिनमान साहित्य उत्सव; ‘नरकातील स्वर्ग’ पुस्तकावर विशेष चर्चा, संजय राऊत यांच्याशी संवाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोल्हापुरात आजपासून दोन दिवसीय दिनमान साहित्य उत्सव सुरू होत असून पहिल्याच दिवशी शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांची प्रकट मुलाखत होणार आहे. संजय राऊत यांच्या तुरुंगवासातील अनुभवावर आधारित ‘नरकातील स्वर्ग’ पुस्तकावर यावेळी चर्चा होणार आहे. ‘महाराष्ट्र दिनमान’चे संपादक डॉ. विजय चोरमारे आणि पत्रकार अमेय तिरोडकर हे त्यांची मुलाखत घेणार आहेत.

कोल्हापूरच्या दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवनात शुक्रवार व शनिवारी हा साहित्य उत्सव होणार आहे. ज्येष्ठ हिंदी साहित्यिक उदय प्रकाश, अभिनेत्री चिन्मयी सुमीत, प्रज्ञा दया पवार, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक श्यामकांत देवरे यांच्यासह अनेक साहित्यिक व कलाकार उत्सवात सहभागी होणार आहेत.