तेल चोरीच्या प्रयत्नादरम्यान विषारी वायू नाकात गेला, 37 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तेल चोरीच्या प्रयत्नादरम्यान विषारी वायू नाकात गेल्याने 37 जणांचा मृत्यू झाला. नायजेरियातील ओक्रिका स्थानिक सरकारी क्षेत्रातील ओकारी जेट्टी गुरूवारी ही घटना घडली. नायजेरियन पोलिसांना घटनेला दुजोरा दिला आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, पीडित व्यक्ती रिव्हर्स राज्यातील टॅपिंग पॉईंटवर कच्चे तेल चोरण्याचा प्रयत्न करत होत्या. कच्चे तेल बोटींमध्ये हस्तांतरित करण्याचा प्रयत्न करत असताना, उच्च दाबाने सोडलेल्या वायूच्या संपर्कात आल्या. यात 37 जणांचा मृत्यू झाला.