Jammu Kashmir – बडगाममध्ये सुरक्षा दलाकडून एका दहशतवाद्याचा खात्मा, घटनास्थळावरून शस्त्रे जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू आणि कश्मीरमधील बडगामच्या अशदर गल्ली परिसरात लष्कराने एका संयुक्त कारवाईदरम्यान एका दहशतवाद्याला ठार केले आहे. गुप्त माहितीच्या आधारे लष्कर, जम्मू-कश्मीर पोलीस आणि श्रीनगर सीआरपीएफने परिसरात शुक्रवारी संयुक्त शोध मोहीम सुरू केली. अद्याप शोध मोहीम सुरू आहे.

या कारवाईदरम्यान जवानांना संशयास्पद हालचाली दिसून आल्यानंतर दहशतवाद्यांना शरण येण्याचे आवाहन केले. मात्र दहशतवाद्यांनी गोळीबार केला. सुरक्षा दलांनी यै गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर दिला. या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. ठार झालेल्या दहशतवाद्याकडून एके 47 रायफल आणि इतर लढाऊ साहित्य जप्त करण्यात आले आहे, असे एबीपी न्यूजने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.