
रशिया-युक्रेन युद्धादरम्यान समुद्रातून रशियन जहाज जप्त करणे हा दहशतवाद आहे, असे रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी म्हटले आहे. नॉर्वेने रशियन संशोधन जहाज प्रोफेसर मोलचानोव ताब्यात घेतल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. नॉर्वेने युक्रेनच्या सरकारी कंपनी नाफ्टोगाजच्या मागणीवरून हे जहाज ताब्यात घेतले.

























































