केनियातील टाटा केमिकल्सचे काम बंद होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केनियामध्ये सुरू असलेले टाटा केमिकल्सचे काम बंद केले जाणार आहे. टाटा केमिकल्स लेक मगादीमधून कच्चा माल काढून सोडा अॅश बनवते आणि त्याची हिंदुस्थानसह जगभरात निर्यात करते. इतकी वर्षे काम करूनही टाटा केमिकल्सच्या उपस्थितीमुळे केनियाच्या अर्थव्यवस्थेला आणि तेथील स्थानिक लोकांना कोणताही फायदा झालेला नाही. त्यांनी आदेश दिला की कंपनीने देशातील आपले कामकाज तत्काळ थांबवावे, असे केनियाचे राष्ट्राध्यक्ष रुटो म्हणाले.