
ज्येष्ठ ‘तालयोगी’ पंडित सुरेशराव तळवलकर यांना ‘चतुरंग प्रतिष्ठान’चा जीवनगौरव पुरस्कार आज जाहीर झाला. मानपत्र, सन्मानचिन्ह आणि तीन लाख रुपयांचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरूप आहे. डिसेंबरमध्ये होणाऱया चतुरंग रंगसंमेलनात पंडित तळवलकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
पंडित तळवलकर यांनी गेली अनेक वर्षे सर्जनशिलतेने, अव्वल प्रतिभेने तालवाद्य कला प्रकारात बहुमोल योगदान दिले आहे. वादनकलेतील, खासकरून तबलावादनात त्यांनी उत्तुंग कामगिरी केली आहे. त्यांनी अत्यंत कष्टपूर्वक तालवाद्यांच्या सर्व प्रकारांना आत्मसात करून, संशोधनपूर्ण अभ्यासाने त्यात भर घालून अनेकानेक नवोन्मेषी प्रयोग केले आहेत. त्यांच्या जीवनभराच्या व्यापक कार्याचा विचार करून यंदाच्या पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली.
























































