म्हाडा एसआरएकडून घेणार 82 घरे, पीएमजीपीतील रहिवाशांचे तात्पुरते स्थलांतरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mumbai-mhada-lottery-delay-75000-applicants-waiting-for-2640-houses-draw-date

अंधेरी पूर्व पूनम नगर येथील धोकादायक पीएमजीपी वसाहतीचा पुनर्विकास म्हाडामार्फत करण्यात येणार आहे. या रहिवाशांचे तात्पुरते स्थलांतरण करण्यासाठी म्हाडा एसआरएकडून 82 घरे भाडेतत्त्वावर घेणार आहे. जोगेश्वरी आणि अंधेरी पूर्व येथे ही घरे आहेत.

पीएमजीपी वसाहतीत चार मजली 17 इमारती असून त्यात 942 निवासी तर 42 अनिवासी गाळे आहेत. म्हाडा बी.जी. शिर्के कंत्राटदाराच्या माध्यमातून या वसाहतीचा पुनर्विकास करणार आहे. या रहिवाशांना दरमहा 25 हजार रुपये देण्याबाबतचा प्रस्ताव म्हाडाने मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठवला आहे. मात्र ज्या रहिवाशांना भाडे नको, त्याच परिसरात घर हवे अशा रहिवाशांची तात्पुरती निवाऱयाची सोय करण्यासाठी म्हाडा एसआरएकडून 82 घरे भाडेतत्त्वावर घेणार आहे.

  • जोगेश्वरी आणि अंधेरी येथे असलेल्या या घरांसाठी म्हाडा प्रत्येक घरामागे 50 हजार रुपये डिपॉझिट आणि दरमहा दहा हजार रुपये भाडे एसआरएला देणार आहे. म्हणजेच दरमहा 8 लाख 20 हजार रुपये म्हाडा भाडय़ापोटी खर्च करणार आहे. करारानुसार, म्हाडा दरवर्षी दहा टक्के भाडेवाढ एसआरएला देणार आहे.