अमराठी रिक्षा-टॅक्सीचालक पुन्हा मराठीचे धडे गिरवणार, 2 ऑक्टोबरपासून शिकवणी वर्ग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईसह राज्यभरातील अमराठी रिक्षा आणि टॅक्सीचे चालक पुन्हा मराठी भाषेचे धडे गिरवणार आहेत. 15 ऑगस्टपूर्वी अमराठी चालकांसाठी शिकवणी वर्ग घेण्यात आले होते. त्यानंतरही अनेक रिक्षाचालक व टॅक्सीचालक मराठी भाषेचे ज्ञान अवगत करू शकलेले नाहीत. त्यांच्यासाठी 2 ऑक्टोबर रोजी ‘गांधी जयंती’चे औचित्य साधून नव्याने मराठी भाषा शिकवणी वर्ग सुरू केले जाणार असल्याचे परिवहन विभागातील सूत्रांनी सांगितले.

अमराठी रिक्षाचालक आणि टॅक्सीचालकांना प्रवाशांसोबत मराठीत बोलणे तसेच मराठी भाषेत लिहिता, वाचता येणे सक्तीचे करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्याची अंमलबजावणी म्हणून 17 ऑगस्टपासून कारवाईची सुरुवात करण्यात आली होती.