ट्रेंड – जेव्हा पैसा बोलतो…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इक्वेडोर देशामधील ग्वायाकिल येथील एका व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये, रस्त्यावर दारू तपासणीदरम्यान एक नशेत असलेला प्रवासी बँकेचे कार्ड फोनप्रमाणे कानाला लावताना दिसत आहे. वाहतूक अधिकाऱयांनी नियमित दारू तपासणीसाठी हे वाहन थांबवले होते. पोलिसांनी थांबवल्यावर ही व्यक्ती गाडीतून उतरते, फोनऐवजी ओळखपत्र बाहेर काढत त्या ओळखपत्राला फोन समजून वकिलाला फोन करते. स्थानिक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की कार्ड वापरणारा माणूस प्रवासी होता. त्याचे काका गाडी चालवत होते. नंतर स्पष्ट झाले की या व्यक्तीने बिअर, वाईन आणि व्होडका एकत्र प्यायली होती, ज्यामुळे तपासणीदरम्यान त्याचा गोंधळ उडाला. हा व्हिडीओ 24 हजारांहून अधिक जणांनी पाहिला असून ‘त्याला खरंच दारू चढली आहे.’ तर एकाने एलियन टेक्नॉलॉजी अशा कॉमेंटस केल्या आहेत.