
गोकुळ अष्टमी उत्सवानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात श्री विठ्ठलास आकर्षक व पारंपरिक सुवर्ण अलंकारांनी अलंकृत करण्यात आले. पारंपरिक अलंकारांनी सजलेले श्री विठ्ठलाचे विलोभनीय रूप पाहण्यासाठी तसेच दर्शनासाठी मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.
गोकुळ अष्टमी उत्सवा निमित्त श्री विठ्ठलास सोन्याचा मुकुट, कौस्तुभ मणी, दंडपेठया जोड मोठा, हिऱ्याची कंगनजोड, शिरपेच लहान दहा लोक असलेला, मोत्याचा तुरा, नाम निळाचा, मोत्याची कंठी एक पदरी, मोत्याची कंठी दोन पदरी, बाजीराव कंठी तोडे जोड, मोहरांची माळ, तुळशीची माळ एक पदरी, इमिटेशन नेकलेस, मस्त्य जोड आदी पारंपरिक व मौल्यवान अलंकार परिधान करण्यात आले.
गोकुळ अष्टमीच्या पावन पर्वानिमित्त श्री विठ्ठलाचे हे मनोहारी रूप भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले असून, भाविकांनी भक्तिभावाने श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले.



























































