
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहरातील खड्डे भरण्यास सुरुवात झाली आहे. रत्नागिरी नगरपरिषद हे सर्व खड्डे भरत आहे. खड्डे भरण्याचा दैनंदिन आढावा रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी वैभव गारवे घेत आहेत. गणपती आगमनापूर्वी प्राधान्याने रस्त्यावरील खड्डे बुजवले जातील असा विश्वास गारवे यांनी व्यक्त केला आहे. रत्नागिरी शहरातील रस्त्यामधील खड्डे भरण्याचे काम दिवस-रात्र सुरु आहे. रत्नागिरी शहरातील जयस्तंभ, एसटी स्टॅण्ड, सिव्हिल हॉस्पिटल आणि माळनाका परिसरातील खड्डे भरण्यात आले असून उर्वरित भागातील खड्डे भरण्याचे काम सुरू आहे.

























































