मुंबई आणि कोल्हापूर दरम्यान 4 अतिरिक्त गणपती विशेष गाड्या धावणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रवाशांच्या मागणीनुसार रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (कोल्हापूर) दरम्यान 4 अतिरिक्त गणपती विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. या गाड्यांना दादर, ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, जेजुरी, लोणंद, सातारा, कराड, किर्लोस्करवाडी, सांगली आणि मिरज येथे थांबे देण्यात येतील. गणपती विशेष गाड्यांचे आरक्षण सर्व पीआरएस केंद्रांवर आणि आयआरसायटीसी च्या संकेतस्थळावर 11 सप्टेंबर 2026 रोजी सुरू होईल.

गाडी क्रमांक 01417 विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 12 सप्टेंबर 2026 आणि 14 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 2.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 4.20 वाजता कोल्हापूर येथे पोहोचेल. गाडी क्रमांक 01418 विशेष गाडी कोल्हापूर येथून 12 सप्टेंबर 2026 आणि 14 सप्टेंबर 2026 रोजी मध्यरात्री 00.05 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 1.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.