सेन्सॉर बोर्डाची पुनर्रचना! प्रीती झिंटा, सुनील शेट्टी, पंकज त्रिपाठींसह १८ जणांची समितीवर निवड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकारने सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) म्हणजेच सेन्सॉर बोर्डाची पुनर्रचना केली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने बुधवारी यासंदर्भातील अधिकृत अधिसूचना जारी केली. या नव्या समितीत १८ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली असून, यामध्ये मनोरंजन क्षेत्रातील अनेक प्रसिद्ध चेहऱ्यांचा समावेश आहे.

सरकारने तत्काळ प्रभावाने सेन्सॉर बोर्डाच्या नवीन सदस्यांची नियुक्ती केली आहे. या समितीचा कार्यकाळ पुढील तीन वर्षे किंवा सरकारचा पुढील आदेश येईपर्यंत असणार आहे. आता हिंदुस्थानात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांना प्रमाणपत्र देण्याचे आणि त्यांची पडताळणी करण्याचे महत्त्वाचे काम हे नवीन सदस्य करणार आहेत. सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदी मे महिन्यापासून शशी शेखर वेम्पती कार्यरत असून, त्यांच्या अध्यक्षतेत आता हे १८ सदस्य काम पाहतील.

चित्रपट, टेलिव्हिजन आणि प्रादेशिक सिनेमांमधील दिग्गजांना या समितीत स्थान देण्यात आले आहे. यात प्रीती झिंटा, सुनील शेट्टी, पंकज त्रिपाठी, रुपाली गांगुली, पल्लवी जोशी, निशिगंधा वाड, मनोज जोशी आणि बंगाली सुपरस्टार प्रसेनजीत चॅटर्जी यांचा समावेश आहे.

सेन्सॉर बोर्डाच्या नव्या १८ सदस्यांची संपूर्ण यादी

१. प्रीती झिंटा
२. सुनील शेट्टी
३. पंकज त्रिपाठी
४. रुपाली गांगुली
५. पल्लवी जोशी
६. निशिगंधा वाड
७. मनोज जोशी
८. प्रसेनजीत चॅटर्जी
९. प्रियदर्शन
१०. वामन केंद्रे
११. नीला माधव पांडा
१२. रिकी केज
१३. हंसराज हंस
१४. विनोद अनुपम
१५. अभिषेक जैन
१६. सुप्रिया यार्लागड्डा
१७. यतींद्र मिश्रा
१८. रमेश पतंगे