
ऐन सणासुदीत आणि लग्नसराईच्या तोंडावर सोन्याच्या दागिन्यांवर आणि कलापृतींवर लागणाऱया हॉलमार्ंकग शुल्कात 67 टक्के वाढ करण्यात आली आहे. या वाढीमुळे आता ज्वेलर्सना प्रति वस्तू 45 रुपयांऐवजी 75 रुपये द्यावे लागतील. प्रत्येक आर्टिकलच्या हॉलमार्ंकग शुल्कात 30 रुपये जास्तीचे द्यावे लागतील. चांदीच्या वस्तूंसाठी हॉलमार्किंग शुल्क प्रति आर्टिकल 35 रुपये स्थिर ठेवण्यात आले आहे. ज्वेलर्स 30 रुपयाचा अतिरिक्त खर्च तर उचलू शकतात किंवा ते दागिन्यांच्या मेकिंग चार्ज, एकूण किमतीत जोडू शकतात.
सोने हजाराने तर चांदी अडीच हजारांनी वाढले
सोने आणि चांदीच्या किमतीत बुधवारी वाढ झाली. सोने 992 रुपयांनी तर चांदी 2 हजार 418 रुपयांनी महाग झाली आहे. बुधवारी झालेल्या वाढीमुळे सोने आता प्रति तोळा 1 लाख 52 हजारांपर्यंत पोहोचले आहे. तर चांदी प्रति किलो 2 लाख 29 हजार रुपये झाली आहे.
मंगळवारी सोने-चांदीच्या दरात घसरण झाली होती. सोन्याचा भाव 1 हजार 36 रुपयांनी घसरून 1 लाख 51 हजार रुपयांवर आला होता. तर एक किलो चांदीची किंमत 19 रुपयांनी कमी होऊन 2.29 लाख रुपयांवर आली होती.


























































