
महापालिकेच्या कार्यालयातील टिपू सुलतानचा फोटो हटवण्याच्या पोलिसांच्या नोटीसला मालेगाव उपमहापौरांनी उच्च न्यायालयात याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. या याचिकेचे उत्तर तीन आठवड्यांत सादर करण्याचे आदेश न्यायालयाने राज्य शासनाला दिले आहेत.
बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, सावित्रीबाई फुले यांच्यासह ११ महापुरुषांचा फोटो माझ्या कार्यालयात आहे. टिपू सुलतानच्या फोटोवर आक्षेप घेत शिंदे गटाचा नगरसेवक निलेश काकडेने याची तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी हा फोटो काढण्याची नोटीस धाडली आहे. ही नोटीसच रद्द करण्याची मागणी याचिकेत केली आहे. यावर मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी व न्या. अद्वैत सेठना यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
उपमहापौर शान-ए-हिंद
निहाल अहमद यांनी ही याचिका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉ. नाशिक दिवाणी न्यायालयात टिपू सुलतानचा फोटो आहे. त्याची कोणी तक्रार करत नाही. अन्य महापुरुषांसोबत टिपू सुलतानचा फोटो माझ्या कार्यालयात आहे. महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रीय नेता म्हणून नोंद नसलेल्या अब्दुल कलाम आझाद व फातिमा शेख यांचा फोटो माझ्या कार्यालयात आहे, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.


























































