मध्य रेल्वेवर उद्या एक्सप्रेसचे वेळापत्रक कोलमडणार; ठाणे ते कल्याणदरम्यान पाचव्या-सहाव्या मार्गिकेवर ब्लॉक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वे मार्गावर ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर रविवारी, 20 सप्टेंबरला मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. या ब्लॉक काळात लांब पल्ल्याच्या गाडय़ांचे वेळापत्रक कोलमडणार आहे. मेल-एक्सप्रेस गाडय़ा अप आणि डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत.

ठाणे आणि कल्याणदरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मेल/एक्सप्रेस गाडय़ांच्या मार्गात बदल करण्यात येणार आहे. ‘डाऊन’ दिशेच्या मेल आणि एक्सप्रेस गाडय़ा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान ‘डाऊन’ जलद मार्गावरून वळवण्यात येतील. तसेच मेमू गाडय़ांच्या सेवेतही बदल करण्यात येणार आहेत.

पश्चिम रेल्वेवर आज रात्री ब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवारी रात्री सांताक्रुझ आणि माहीम स्थानकांदरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. अप फास्ट जलद मार्गावर रात्री 12 ते पहाटे 4 वाजेपर्यंत तसेच डाऊन जलद मार्गावर रात्री 12.30 ते पहाटे 4.30 वाजेपर्यंत जम्बो ब्लॉक असेल, असे पश्चिम रेल्वे प्रशासनाने जाहीर केले.