कॅनडात दोन हिंदुस्थानी विद्यार्थ्यांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कॅनडामध्ये विमान उड्डाणांचे प्रशिक्षण घेत असताना झालेल्या अपघातात दोन हिंदुस्थानी विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भारतीय दूतावासाने एक्सवर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली असून मृत विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मनोज शिवकुमार आणि श्रीसरन तिरुज्ञानसंबंथम अशी या दोन विद्यार्थ्यांची नावे आहेत.

र्हाव्ह्स एअरकडून चालविले जाणारे ‘सेसना 172’ हे विमान सस्काचेवानमधील किस्बेजवळ कोसळले. या अपघातात विमानातील दोघांचाही मृत्यू झाला. अपघातग्रस्त विमानात दोन परवानाधारक वैमानिक होते. रात्रीच्या वेळी देशांतर्गत उड्डाण करत असताना ही दुर्घटना घडली.