
महापालिकेच्या वतीने आयोजित ‘श्रीगणेश गौरव पुरस्कार स्पर्धा-2026’मध्ये अंधेरी येथील स्वप्नाक्षय मित्र मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. सुमारे 75 हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे त्या पुरस्काराचे स्वरूप आहे. घाटकोपर येथील अखिल भटवाडी सार्वजनिक उत्सव मंडळ ‘भटवाडीचा राजा’ मंडळाने द्वितीय पुरस्कार (50 हजार रुपये आणि सन्मानचिन्ह) आणि करी रोड येथील पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळाने तृतीय पुरस्कारावर (35 हजार आणि सन्मानचिन्ह) मोहोर उमटवली आहे.
जनसंपर्क खात्याने या स्पर्धेचे आयोजन केले होते. यंदा शाडू मातीच्या सर्वोत्कृष्ट गणेशमूर्तीचा पुरस्कार कांजूरमार्ग येथील शिवशक्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास, तर सर्वोत्कृष्ट मूर्तिकाराचे पारितोषिक ‘मुंबईचा पेशवा’ गणेशमूर्तीसाठी मूर्तिकार मयेकर यांना देण्यात आले.






























































