‘नटरंग उभा’; सेंट झेवियर्समध्ये उलगडणार मराठी रंगभूमीचा प्रवास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

सेंट झेवियर्स कॉलेजच्या मराठी वाङ्मय मंडळाने ‘इनोउग्रल’ या वार्षिक महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा 26 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता पार पडणार आहे. उद्घाटन सोहळ्यासाठी मंडळाने यंदा ‘नटरंग उभा’ ही थीम ठेवली असून या माध्यमातून ते मराठी रंगभूमीचे पिढय़ान्पिढय़ा बदलत गेलेले स्वरूप आणि त्याचा प्रवास मांडणार आहेत.

‘मराठी वाङ्मय मंडळ’ गेली 102 वर्षे विद्यार्थ्यांना मराठी कला आणि संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी व समजून घेण्यासाठी सातत्याने प्रोत्साहन देत आहे. तरुण पिढीला मराठी भाषा, साहित्य, संस्कृती आणि रंगभूमीशी अधिक जवळून जोडणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. उद्घाटन सोहळ्यात संगीत, नृत्य, नाटक आणि साहित्याच्या माध्यमातून रंगभूमीचे विविध पैलू व्यासपीठावर साकारले जाणार आहेत.