कलिना मध्यवर्ती ग्रंथालय भूखंड गैरव्यवहार प्रकरण – छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कलिना येथील राज्य मध्यवर्ती ग्रंथालय उभारणीच्या गैरव्यवहार प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेले अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना मुंबई सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. भुजबळ यांच्यासह अभियंता गजानन सावंत, हरीश पाटील व सीए रवींद्र सावंत यांची सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

जुलै 2009 मध्ये हे पंत्राट इंडिया बुल्स या पंपनीला देण्यात आले. हे कंत्राट देताना मोठय़ा प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. आरोपींमध्ये भुजबळ यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागातील इतर अधिकाऱयांचा समावेश आहे. याप्रकरणी लाचलुचपत विभागाने (एसीबी) भुजबळ यांच्यासह सहा जणांवर आरोपपत्र दाखल केले होते. याप्रकरणी दोषमुक्ततेसाठी विशेष सत्र न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता.