
रत्नागिरी तालुक्यातील निरुळ गावातील दोणी येथील एका झाडाला अज्ञाताने गळफास घेत आत्महत्या केली. शुक्रवारी 25 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी पूर्णगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत तेथील नागरिकांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार, शुक्रवारी दुपारच्या सुमारास निरुळ गावातील दोणी येथील जंगलमय परिसरात अज्ञात मृतदेह आष्ट्याच्या झाडाला नायलॉन दोरीने गळफास घेतलेल्या व कुजलेल्या अवस्थेत दिसून आला. याप्रकरणी अधिक तपास पूर्णगड पोलीस करत आहेत.






























































