दहशतवादी हल्ल्याची शक्यता नाकारता येत नाही; वैमानिकावर झालेल्या चाकू हल्ल्यासंदर्भात इस्रायली अधिकाऱ्याची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुबई ते तेल अवीव या फ्लाय दुबईच्या विमानात दोन पायलटांमध्ये भांडण झाले. यानंतर, एका पायलटने आंतरराष्ट्रीय आपत्कालीन कोड ७७०० पाठवला. या कोडचा अर्थ विमान अपहरणाचा प्रयत्न होत (हायजॅक) आहे. सीएनएनच्या वृत्तानुसार, सूचना मिळाल्यानंतर इस्रायली हवाई दलाची लढाऊ विमाने पाठवण्यात आली. या वृत्तात असेही म्हटले आहे की, विमान अवघ्या दोन मिनिटांत ३४,००० फूट उंचीवरून अंदाजे १६,६०० फूट (१७,४०० फूट) खाली उतरले. त्यानंतर हे विमान सौदी अरेबियामध्ये उतरवण्यात आले.

याबाबत इस्रायली अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, एका ओमानच्या सह-वैमानिकाने अमिरातीच्या वैमानिकावर चाकूने हल्ला केला आणि विमानाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. इतकेच नाही, तर या अधिकाऱ्याने दहशतवादी हल्ल्याची शक्यताही नाकारली नाही.

फ्लाइट-ट्रॅकिंग डेटामधून असे उघड झाले आहे की, दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बेन गुरियन विमानतळाकडे जाणाऱ्या FZ1073 या फ्लाइटने सर्वप्रथम स्क्वॉक कोड 7700 पाठवला. हा सामान्य आपत्कालीन परिस्थितीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त कोड आहे. मात्र, विमानाने लवकरच आपला कोड बदलून ७५०० केला. हा कोड विमानात बेकायदेशीर हस्तक्षेप झाल्याचे, तसेच संभाव्य अपहरणाचे संकेत देतो.

विमानात अंदाजे १८० इस्रायली प्रवासी होते. नंतर, सुरक्षा अधिकाऱ्यांचा हवाला देत, ‘द जेरुसलेम पोस्ट’ने वृत्त दिले की, दोन पायलटांमध्ये झालेल्या “हिंसक” वादानंतर विमानाला आपत्कालीन लँडिंग करावे लागले. वृत्तानुसार, विमानातील सर्वजण सुरक्षित होते.

पहाटे १:२० च्या सुमारास, विमान ३४,००० फुटांवरून अंदाजे १६,६०० फुटांपर्यंत, म्हणजेच १७,४०० फुटांपर्यंत, केवळ दोन मिनिटांत खाली आले, तेव्हा आपत्कालीन संकेत जारी करण्यात आला. विमानातून पहिला आपत्कालीन संकेत पहाटे १:३२ वाजता पाठवण्यात आला होता.

एका दुसऱ्या अधिकाऱ्याने सांगितले की, इस्रायलच्या अनेक नागरिकांना घेऊन जाणाऱ्या विमानाचे अपहरण होण्याची भीती असल्याने इस्रायलने लढाऊ विमाने पाठवली आहेत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी अलीकडेच वाढत्या सुरक्षा धोक्यांबद्दल इशारा दिला आहे, मात्र त्यांनी कोणताही तपशील दिलेला नाही. या घटनेमागे दहशतवादी हल्ल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.