‘बोल्ड स्ट्रोक्स शार्प ह्युमर’, बाळासाहेब ठाकरे यांनी काढलेल्या व्यंगचित्रांचे बंगळुरू येथे प्रदर्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार, हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त बंगळुरू येथे व्यंगचित्रांचे विशेष प्रदर्शन भरवण्यात आले आहे. ‘बोल्ड स्ट्रोक्स शार्प ह्युमर’ असे या प्रदर्शनाचे नाव आहे. प्रदर्शनात बाळासाहेब ठाकरे यांनी काढलेली तब्बल 100 व्यंगचित्रे तसेच त्यांची अनेक दुर्मीळ छायाचित्रे पाहण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ कार्टुनिस्ट या संस्थेने मिडपर्ह्ड हाऊसमध्ये प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. हे प्रदर्शन 3 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबरपर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत रसिकांसाठी खुले असेल.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. प्रसिद्ध कार्टुनिस्ट प्रशांत कुलकर्णी प्रदर्शनाचे क्युरेटर आहेत. प्रदर्शनाचे उद्घाटन कला इतिहासकार डॉ. आर.एच. कुलकर्णी यांच्या हस्ते होईल.

प्रदर्शनात काय पहाल…

 बाळासाहेबांच्या ‘फ्री प्रेस’ ते ‘मार्मिक’पर्यंतच्या प्रवासातील निवडक 100 व्यंगचित्रे.
 बाळासाहेबांची दुर्मीळ छायाचित्रे, लतादीदी, पंडित भीमसेन जोशी, जॉर्ज फर्नांडीस आणि अन्य महनीय व्यक्तींसोबतची 20 छायाचित्रे.