
स्वच्छ-सुंदर मुंबईसाठी पालिकेने जीआय पद्धतीने मॅपिंग करून कचरापेट्या बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सर्व वॉर्डमधील गर्दीच्या ठिकाणांचा अभ्यास करून 30 ते 100 मीटर अंतरावर कचऱ्याचे नवीन डबे बसवण्यात येणार आहेत. पालिकेच्या नियोजनानुसार 40 लिटर क्षमतेच्या कचरापेट्या गर्दीच्या ठिकाणी फुटपाथवर बसविण्यात येतील.
उघडय़ावर टाकल्या जाणाऱया कचऱ्यामुळे दुर्गंधी आणि आजारांची समस्या निर्माण होत असल्यामुळे कचरापेट्यांची संख्या वाढविण्यापेक्षा जिथे गरज आहे तिथेच योग्य अंतरावर कचरापेट्या बसविणे हा महापालिकेचा उद्देश आहे. जीआय पद्धतीच्या अभ्यासातून गर्दीची ठिकाणे, पादचारी वर्दळ, विद्यमान कचरा संकलन व्यवस्था आणि परिसराची भौगोलिक परिस्थिती यांचा विचार करून कचरापेटय़ांची ठिकाणे निश्चित करण्यात येणार आहेत.





























































