
विविध मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतरही एमपीएससीचे विद्यार्थी लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्यावर ठाम आहेत. या मागणीसाठी आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली एम.एम. जोशी मार्गावर गुरुवारी सायंकाळपासून ठिय्या आंदोलन सुरू केले. अध्यक्षांना हटविण्याचा अधिकार राज्य सरकारला नसल्याचे मुख्यमंत्र्यांचे म्हणणे असल्यास, मंत्रिमंडळात प्रस्ताव मंजूर करून तो राज्यपालांमार्फत राष्ट्रपतींकडे पाठवा,’’ अशी मागणी पवार यांनी केली.






















































