
हिंदुस्थानच्या जोडी मनू फ्रान्सिस आणि पुरिसिंकल नोबल यांनी गुरुवारी आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या स्किफ प्रकारातील नवव्या शर्यतीत रौप्य पदक जिंकले. फ्रान्सिस आणि नोबल नऊ शर्यतींनंतर एपूण 23 गुणांसह दुसऱया स्थानावर राहिले.
चीनच्या जोडीने 16 गुणांसह सुवर्णपदक जिंकले. या प्रकारात सर्वात कमी एपूण गुण मिळवणारा संघ जिंकतो. चीनच्या संघात वेन जियाडिंग आणि लिऊ टियान यांचा समावेश होता. पुरुषांच्या स्किफ सेलिंगमध्ये प्रत्येक शर्यतीत मिळवलेल्या स्थानानुसार गुण दिले जातात. पहिल्या स्थानावरील खेळाडूला एक गुण मिळतो आणि सर्वात कमी एपूण गुण मिळवणारा खेळाडू जिंकतो.
सेलिंगमध्ये महिलांनी जिंकलं कांस्य
पुरुषांनी सेलिंगमध्ये दमदार कामगिरी करत रौप्य पदक पटकावले होते. त्यानंतर सर्वांच्या नजरा सेलिंग या खेळात हिंदुस्थानी महिलांवर खिळलेल्या होत्या. पण त्यांना रौप्य पदक मात्र जिंकता आले नाही. महिलांनी सेलिंगच्या स्कीफ प्रकारात कांस्यपदक जिंकले. हर्षिता तोमर आणि शीतल वर्मा यांनी दमदार कामगिरी करत संघाला कांस्यपदक मिळवून दिले.























































