
हिंदुस्थानच्या महिला स्क्वॉश संघाला आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्य पदकावर समाधान मानावे लागले; पण उपांत्य फेरीत हाँगकाँगकडून संघाला 1-2ने पराभव पत्करावा लागला. हिंदुस्थानचा पुरुष स्क्वॉश संघ आता उपांत्य फेरीत मलेशियाचा सामना करेल.
महिला संघाची पराभवाने सुरुवात
उपांत्य फेरीत अनाहत सिंगने चॅन सिन युकविरुद्ध जोरदार सुरुवात करत पहिले दोन गेम जिंकले. पण चॅन सिनने सलग तीन गेम जिंकले. या विजयामुळे हाँगकाँगने सामन्यात 1-0 अशी आघाडी घेतली.
तन्वीने पुनरागमन केले
तन्वी खन्नाने हिंदुस्थानच्या आशा जिवंत ठेवल्या. तन्वीला पहिल्या गेममध्ये पराभव पत्करावा लागला. त्यानंतर तिने पुनरागमन करत पुढील तीन गेम जिंपून उपांत्य फेरीत देशाला 1-1 अशी बरोबरी करून दिली.
चिनप्पालाही पराभवाला सामोरे जावे लागलs
निर्णायक सामन्यात हो त्झे लोककडून पराभूत झाल्याने जोशना चिनप्पा निराश झाली. हो त्झेने पहिला गेम 11-4 असा जिंकला. त्यानंतर हाँगकाँगच्या खेळाडूने दुसऱया गेममध्ये वर्चस्व गाजवत तो 11-7 असा जिंकला. हो त्झेने तिसऱया गेममध्येही वर्चस्व गाजवत तो 11-9 असा जिंपून हाँगकाँगचे अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले. त्यामुळे हिंदुस्थानच्या संघाला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.
पुरुष स्क्वॉश संघाने कांस्यपदक पटकावले
हिंदुस्थानच्या पुरुष स्क्वॉश संघानेही कांस्यपदक जिंकले. उपांत्य फेरीत भारताला मलेशियाकडून 1-2 असा पराभव झाला. त्यामुळे संघाला सुवर्णपदकाच्या सामन्यात पोहोचता आले नाही आणि कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. यापूर्वी भारतीय महिला स्क्वॉश संघानेही कांस्यपदक जिंकले होते.






























































