ठाण्यातील गुंडगिरीला अमित शहा जबाबदार; त्यांच्या अंगावर पूर्णेकरांचे रक्ताने भिजलेले कपडे फेकले पाहिजेत, संजय राऊत आक्रमक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमित शहा या सैतानी वृत्ती विरोधात या देशात प्रचंड रोष आहे. त्यांनी या देशाचं माफिया राज केललं असून महाराष्ट्रात गुंडाराज करून टाकलयं. एक नंबरचे सगळे गुंड, टोळीवाल्यांना त्यांनी आपल्या पक्षात घेतलय. त्यांच्या मदतीने भाजप हा गुंडाचा पक्ष, भष्टाचाराचा पक्ष केलेला आहे. ठाण्यातला गुंडाराजला अमित शहा जबाबदार असल्याची घणाघाती टीका शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. प्रदीप पूर्णेकरांचे रक्ताने भिजलेले कपडे अमित शहांना सुपुर्द केले पाहिजे. त्यांच्या अंगावर फेकले पाहिजे. महाराष्ट्रात सुरू असलेल्या या नालायकपणाला अमित शहा जबाबदार असल्याचे गंभीर आरोपही संजय राऊत यांनी यावेळी केला.

मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर राज्यासह केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, या प्रकरणात स्वत: लक्ष घालून एसआयटी स्थापन केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार. एसआयटीने तपास योग्य दिशेने, पारदर्शत पद्धतीने कोणत्याही दबावाखाली न करता केला, तरच त्या तपासाला अर्थ राहिलं. मुख्यमंत्र्यांनी ठाण्यातील पोलिसांचा समावेश केला असेल तर तपास योग्य दिशेने होईल याची खात्री काय? वर्षांनुवर्षे हे अधिकारी ठाण्यातच कार्यरत आहेत. आणि ते कोणाचे तरी एजंट म्हणून काम करतायत. अशा अधिकाऱ्यांकडून देवेंद्र फडणवीस प्रदीप पूर्णेकर यांच्या खुनाचा तपास योग्य दिशेने होईल याची खात्री कशी देऊ शकतात, असा गंभीर सवाल त्यांनी उपस्थित केला.

प्रदीप पूर्णेकर यांचा मृत्यू पूर्णपणे राजकीय हत्या असल्याचे संजय राऊत म्हणाले. कालच समाज माध्यमांवर ठाण्यातील लेडी डॉनची क्लिप टाकली. ती कोणत्या भाषेत पुर्णेकरला धमक्या देतेय हे सगळ्यांनी ऐकलं असेल. संपवण्याची, घरात घुसण्याची भाषा आहे त्यात, इतकच नाही तर माझ्या नादाला लागाल तर सीपीला सांगून तुम्हाला सगळ्यांना सरळ करेन, असे शब्द वापरण्यात आले आहे. तेव्हाचे सीपी (कमिश्नर ऑफ पोलीस ठाणे) हेच आताचे सीपी आहेत. एवढी हिंमत.! गृहखात्याचे अधिकार फडणवीसांनी या लेडी डॉनला दिले आहेत का? आणि सीपी हे सगळ कसं सहन करतात. या बाईला ताबडतोब अटक करून, बेड्या घालाव्यास, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

“मुख्य सुत्रधार अद्यापही मोकाट”

सीपीच्या नावाने धमक्या देणं हाच पहिला गुन्हा आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाने धमक्या देणं हे जर दुसरं कोणी केलं असतं तर आत्तापर्यत पोलिसांनी त्याला घरातून उचलून नेलं असतं. तुम्ही दाऊदच्या भावाला पकडता, मोठ्या मोठ्या गुंडांना पकडता, मग हिला का पकडत नाही? पुर्णेकरांच्या हत्येमागच्या षडयंत्राची सुत्रधार मिनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे आहेत. एसआयटी आणि ठाण्याच्या पोलिसांनी किती नवीन कहाण्या समोर आणल्या तरी जनतेचा त्यावर विश्वास नाही. मुख्य सुत्रधार अद्यापही बाहेर आहे. अशा प्रकरणांमध्ये दुसऱ्या तिसऱ्या लेअरचे मारेकरी मुख्य सुत्रधाराच नाव सांगत नाहीत. त्यासाठी त्यांची मानसिक तयारी केलेली असते. या प्रकरणातही ठाण्याच्या लेडी डॉनने आणि तिच्या नवऱ्याने तेच केले असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

महाराष्ट्रात सुरू असलेल्या या नालायकपणाला, ठाण्यातला गुंडाराजला अमित शहा जबाबदार आहेत. त्यामुळे पूर्णेकरांचे रक्ताने भिजलेले कपडे अमित शहांना सुपुर्द केले पाहिजे. त्यांच्या अंगावर फेकले पाहिजे. अमित शहा या सैतानी वृत्ती विरोधात या देशात रोष आहे. त्यांनी कार्यकर्ते नाही तर सैतान उभे केले. दुसऱ्यांचं रक्त पिणारे सैतान उभे केले. पूर्णेकरांचा खून त्याच सैतान शाहीतून झाल्याची टीका संजय राऊत यांनी केली.

“पुर्णेकरांच्या हत्येची पहिली जबाबदारी ठाणे पोलिसांची”

पूर्णेकरांच्या हत्येची पहिली जबाबदारी ठाणे पोलिसांची आहे. या प्रकरणातील पहिला आरोपी ठाण्याचे पोलीस दल आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या कालावधीत ही लेडी डॉन एकनाथ शिंदेच्या जिवावर पोलिसांच्या नावाने आपल्या विरोधी कार्यकर्त्यांना संपवण्याच्या धमक्या देते. यामध्ये पोलीस आयुक्तांचं नाव येऊनही ते काही करत नाहीत. पोलीस आयुक्त हे ठाण्यातील पालकमंत्र्यांचे नोकर आहेत का? माझं आवाहन आहे गणेश नाईक यांच्या सारख्या नेत्यांना फक्त बोलताय काय, ठाण्यात येऊन पूर्णेकरांच्या घरी जा, त्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश बघा आणि ठाण्याचं नेतृत्व करा. या गुंडगिरीविरोधात मोहीम उभी करा आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे संजय राऊत यावेळी म्हणाले. गणेश नाईक प्रखरपणे या गुंडगिरीवर बोलतायत. पण जेव्हा एका राजकीय कार्यकर्त्यांचा खून होतो तेव्हा तुम्ही शांत का? मी आणि आदित्य ठाकरे ठाण्यातील पोलीस स्टेशनलाा गेलो नसतो तर मुख्य आरोपींची नावे देखील एफआयआरमध्ये आली नसती. ठाण्यातील पोलिसांची ही परिस्थिती असताना त्यांच्याकडून पारदर्शक तपास होईल याचा विश्वास कसा बाळगू शकतो, असे म्हणत संजय राऊत यांनी ठाणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

“लेडी डॉन आणि तिच्या नवऱ्याची पक्षातून हकालपट्टी करा”

एकनाथ शिंदे यांनी सर्वात आधी लेडी डॉन आणि तिच्या नवऱ्याची पक्षातून हकालपट्टी केली पाहिजे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली. तुम्ही तिला का पाठिशी घालताय? तिची क्लीप ऐकून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ताबडतोब पक्षातून काढलं असतं. तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेता, त्यांचा फोटो लावता आणि खून करता. कुटुंब रस्त्यावर आणता, त्यांची मुलं आक्रोश करतायत. शिंदे तुम्ही खून केलेला आहे आणि हा खून तुम्हाला पचणार नाही, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.