महसूल मंत्री गावात पोहोचण्याआधीच कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने जीवन संपवले 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे गावात पोहोचण्याआधीच कर्जाच्या डोंगराखाली दबलेल्या शंकर रामभाऊ भारसाकळे (42) या   शेतकऱयाने गळफास घेतला. बुलढाणा जिल्हय़ात चोंडी टाकळेश्वर येथे ही घटना घडली.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे विदर्भात दुष्काळ पाहणी दौऱयावर असून, आज ते बुलढाणा जिल्हय़ाच्या संग्रामपूर तालुक्यातील चोंडी टाकळेश्वर येथे बांधावर जाऊन शेतकऱयांशी संवाद साधणार होते.  बावनकुळे येण्याच्या अगोदरच गळफास घेऊन शेतकऱयाने आत्महत्या केली. शंकर भारसाकळे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे,

राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे, पण मदतीबद्दल अजून अवाक्षरही काढले नाही. सरकारची मदत शेतकऱयांच्या हाती पोहोचण्याआधीच ते मरणाला कवटाळत असल्याचे विदारक चित्र बघायला मिळत आहे. सरकारने कागदोपत्री घोडे नाचवणे सोडून शेतकऱयांना थेट मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.