विहिरीत उडी मारून मायलेकाने संपवले जीवन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वृद्ध आई आणि मुलाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना रोहा तालुक्यातील सुतारवाडी येथील खिलारे फार्म हाऊसमध्ये घडली. हा प्रकार आज सकाळी उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मायलेकाचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढले.

मूळ पुणे जिल्ह्यातील असलेले मनीषा काशीकर (80) आणि मंदार काशीकर (43) खिलारे फार्म हाऊसमध्ये काम करीत होते. या दोघांचे मृतदेह आज सकाळी फार्म हाऊसमधील विहिरीत आढळून आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कोलाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी महेश सानप यांच्या सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेच्या रेस्क्यू पथकाची मदत घेतली. मायलेक दोघेही आजारपणामुळे त्रस्त होते. सततच्या आजारपणाला कंटाळून नैराश्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.