Chhatrapati Sambhaji Nagar News – पैठण शहरात एसटी बस व दुचाकीच्या भीषण अपघातात दोन तरुणांसह चिमूरडी जागीच ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पैठण शहरात आज (4 ऑक्टोबर 2026) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास एसटी बस आणि दुचाकीच्या झालेल्या जोरदार समोरासमोर धडकेत दोन तरुणांसह एका दोन वर्षांच्या चिमूरडीचा जागीच मृत्यू झाला. नाका टू नाका मार्गावरील चक्रेश्वरी दवाखान्यासमोर मुख्य रस्त्यावर हा भीषण अपघात घडला. आगर नांदूर येथील अशोक भालेराव व कृष्णा गायकवाड हे दोन्ही साडू पैठण येथे कपडे खरेदी करण्यासाठी आले होते. खरेदी आटोपून ते आपल्या दोन वर्षांच्या चिमुकलीसह दुचाकीवरून गावाकडे परतत असताना, एसटी बसशी त्यांची जोरदार धडक झाली. ही टक्कर इतकी भयानक होती की, दुचाकीवरील तिघेही रस्त्यावर फेकले गेले व त्यांचा जागीच मृत्यू होऊन घटनास्थळी रक्ताचा सडा पडला.

अपघाताची माहिती मिळताच पैठण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. रुग्णवाहिकेच्या साहाय्याने तिन्ही मृतदेह पैठण येथील शासकीय वैद्यकीय आरोग्य प्रशिक्षण केंद्रात हलविण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी अपघातग्रस्त बस आणि दुचाकी ताब्यात घेतली असून, घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. या दुर्घटनेमुळे आगर नांदूर व पैठण परिसरात शोककळा पसरली आहे.