
एक शिक्षक वर्गाबाहेर जाताना आपल्या पाळीव कुत्र्यावर मोठी जबाबदारी सोपवून जातो. विद्यार्थ्यांवर देखरेख ठेवण्यासाठी तो आपल्या कुत्र्याला वर्गात शिक्षकांच्या खुर्चीवर बसवतो. हे काम अत्यंत गांभीर्याने घेत, कुत्रादेखील शिक्षकाच्या खुर्चीवर अभिमानाने बसलाय आणि संपूर्ण वर्गावर लक्ष ठेवत होता. या व्हिडीओमध्ये दिसते की, विद्यार्थी शांतपणे आपले काम पूर्ण करत आहेत. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. नेटिझन्सनी कुत्र्याला इंटरनेटवरील सर्वात गोंडस मुख्याध्यापक म्हटले आहे. कुत्र्याच्या कडक शिस्तीने प्रभावित होऊन नेटकरी कमेंट्समध्ये विनोद आणि कौतुकाचा वर्षाव करत आहेत. अनेकांनी म्हटले की, ‘शिक्षक जेवढी शांतता राखू शकत नाहीत तेवढी या कुत्र्याच्या पिल्लाने पाच मिनिटांत राखली.’, तर काहींनी गमतीने ‘वर्गात प्रवेश घेण्याची विनंती केली आहे.’ हा व्हिडीओ @tv1indialive या इन्स्टा आयडीवरून शेअर करण्यात आला आहे.

































































