
एमपीएससी परीक्षांशी संबंधित मागण्यांप्रकरणी आंदोलने करून पुण्यातील प्रमुख सार्वजनिक चौक, रस्ते अडवून लोकांना वेठीस धरले जात आहे. या आंदोलकांमुळे नागरिकांची कोंडी होत आहे त्यांना तातडीने हटवण्यात यावे तसेच आंदोलनासाठी स्वतंत्र जागा निश्चित करावी, अशी मागणी करत पुणेकर नागरिकांनी हायकोर्टात धाव घेत याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर उद्या बुधवारी मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. अमित सुपेकर आणि सौरभ वीरकर यांनी ही याचिका दाखल केली आहे.



























































