
व्यावसायिकाच्या घरी साडेसात लाख रुपयांची रोकड चोरीप्रकरणी संतोषकुमार गौड या नोकराला खार पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून चोरीची मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे. तक्ररदार व्यावसायिकाने काही दिवसांपूर्वी कपाटात 13 लाखांची रोकड ठेवली होती. त्यातील साडेसात लाख रुपये मिसिंग असल्याचे दिसले. त्यातच संतोष हा अचानक न सांगता निघून गेल्याने त्याच्यावर संशय निर्माण झाला.






























































