किआरा-सिद्धार्थच्या घरी पुन्हा पाळणा हलणार, सोशल मीडियावरून दिली ‘गुड न्यूज’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेत्री किआरा आडवणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या घरी पुन्हा एकदा पाळणा हलणार आहे. किआरा दुसऱ्यांदा गरोदर असून या दोघांनी सोशल मीडियावरून ही गुड न्यूज दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

किआरा आडवणी व सिद्धार्थ मल्होत्रा यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे, या फोटोत किआरा, सिद्धार्थ आणि त्यांच्या एक वर्षाच्या लेकीचा हात असून तिने लहान बाळाचे मोजे हातात धरले आहेत. त्यासोबत त्यांनी ” आम्हाला पुन्हा एकदा आयुष्यातील सर्वात मोठा आणि अनमोल आशीर्वाद मिळाला आहे. आम्ही या सगळ्यासाठी कृतज्ञत आहोत”, असे त्यांनी पोस्ट केले आहे.

‘शेरशाह’ चित्रपटाच्या सेटवर किआरा व सिद्धार्थ यांच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली. त्यानंतर फेब्रुवारी २०२३ मध्ये ते विवाहबद्ध झाले व जुलै 2025 ला त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले. त्यांच्या पहिल्या मुलीचे नाव सरायाह आहे.