
कॉक्रोच जनता पक्षाने (सीजेपी) पुन्हा एकदा दिल्लीत आंदोलनाची तयारी केली आहे. सीजेपीने १० ऑक्टोबर रोजी प्रस्तावित आंदोलनाबद्दल दिल्ली पोलिसांना कळवले आहे. मात्र पोलिसांनी अद्याप आंदोलनासाठी परवानगी दिलेली नाही. तसेच नवी दिल्ली परिसरात बीएनएसएसचे कलम १६३ लागू आहे.
सीजेपीचे सौरभ दास म्हणाले की, हे केवळ सीजेपीचे आंदोलन नसून जेन-झीचे आंदोलन असेल. जोपर्यंत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना हटवले जात नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असे ते म्हणाले. नवी दिल्ली परिसरात सध्या भारतीय नागरी सुरक्षा संहितेचे (बीएनएसएस) कलम १६३ लागू आहे. त्यामुळे, १० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या प्रस्तावित आंदोलनाबाबत सर्वजण पुढील निर्णयाची वाट पाहत आहेत.
३ ऑक्टोबर रोजी सीजेपीच्या आंदोलनादरम्यान एक नवीन वाद निर्माण झाला. तीन महिला पत्रकारांनी पोलीस अधिकाऱ्यांकडून लैंगिक छळ आणि गैरवर्तनाचा आरोप केला. तक्रारी मिळाल्यानंतर, दिल्ली पोलिसांनी निष्पक्ष तपासासाठी हे प्रकरण गुन्हे शाखेकडे सोपवले.आता १० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सीजेपीच्या आणखी एका आंदोलनाची तयारी सुरू आहे. नवी दिल्ली परिसरात लागू असलेले बीएनएसएसचे कलम १६३ त्यामुळे हा विषयावर चर्चा होत आहे.

























































