
भारतीय कामगार सेनेच्या प्रयत्नांमुळे ब्लू स्टार कंपनीच्या कामगारांचा वेतनवाढ करार करण्यात आला. या करारानुसार कामगारांच्या वेतनात 17,450 रुपयांची भरघोस वाढ करण्यात आली. यामुळे कामगारांची दिवाळी जोरात होणार आहे.
भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, कार्याध्यक्ष अजित साळवी यांच्या मार्गदर्शनानुसार भारतीय कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस संजय कदम यांच्या अथक प्रयत्नाने हा करार संपन्न झाला. यावेळी व्यवस्थापनाच्या वतीने ग्रुप प्रेसिडेंट (उत्पादन) मनीष झा, ग्रुप चीफ एचआर ऑफिसर अरुण राजन, महाव्यवस्थापक मंगेश वाळवे, सहाय्यक महाव्यवस्थापक मनीष प्राशर, चंद्रनाथ मिश्रा यांच्यासह भारतीय कामगार सेनेचे सहचिटणीस आणि युनिट अध्यक्ष किरण मलप, उपाध्यक्ष योगेश पाटील, सचिव शहानवाज मन्सुरी, खजिनदार गणेश पाटील, सदस्य नितीन तरे, सुधीर पटारे, निलेश गोले उपस्थित होते.






























































