
जगभरातील हवामान तज्ज्ञांनी एल निनोच्या तीव्र होत चाललेल्या प्रभावाबाबत चिंता व्यक्त केली आहे. यंदा एल निनोची स्थिती अत्यंत तीव्र होण्याची शक्यता असून या नैसर्गिक हवामान प्रक्रियेमुळे जगातील अनेक भागांमध्ये नेहमीपेक्षा अधिक तापमानाची नोंद होऊ शकते. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक हवामान संघटनेने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, यंदाचा एल निनो हा 1950 नंतरच्या सर्वाधिक तीव्र ठरू शकतो. यामुळे जगभरातील ऋतुचक्र विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
प्रशांत महासागरातील पाण्याचे तापमान वाढणे आणि महासागरात साठलेली उष्णता वातावरणात मुक्त होणे ही एल निनोच्या प्रभावातील महत्त्वाची प्रक्रिया आहे. या बदलांचा परिणाम केवळ प्रशांत महासागराच्या आसपासच्या प्रदेशांपुरता मर्यादित राहत नाही, तर जगभरातील तापमान, पर्जन्यमान आणि ऋतुचक्रावर होतो. त्यामुळे आगामी काही महिन्यांत पृथ्वीच्या मोठ्या भूभागाला उष्णतेच्या तीव्र लाटेचा सामना करावा लागू शकतो.
As forecasted 5 months ago, we’re going to need a bigger y-axis…
Super-duper El Niño it is… https://t.co/8X6FK2JTIK
— Leon Simons 🌍 (@LeonSimons8) September 30, 2026
अमेरिकेतील हवामानतज्ज्ञ रायन माऊ यांनी सोशल मीडियावर पृथ्वीवरील तापमानवाढ दर्शवणारा जागतिक हवामान नकाशा प्रसिद्ध केला. या नकाशातील बहुतांश भाग लाल रंगात दिसत असल्याचे नमूद करत त्यांनी एल निनोच्या तीव्रतेकडे लक्ष वेधले आहे. उत्तर गोलार्धातील हिवाळ्याच्या काळातही एल निनोचा प्रभाव उच्च पातळीवर कायम राहू शकतो. अमेरिकेचा बहुतांश भाग हा संभाव्य जागतिक तापमानवाढीच्या या व्यापक चित्राला अपवाद ठरू शकतो, असेही त्यांनी म्हटले आहे. जागतिक हवामान संघटनेच्या अंदाजानुसार, एल निनोचा प्रभाव फेब्रुवारी 2027 पर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे 2026 च्या अखेरच्या महिन्यांपासून 2027 च्या सुरुवातीपर्यंत जागतिक तापमान आणि हवामानातील बदलांवर त्याचा प्रभाव जाणवू शकतो.
हवामान शास्त्रज्ञ झेक हौसफादर यांनीही एल निनोच्या वाढत्या तीव्रतेबाबत चिंता व्यक्त केली आहे. एल निनोशी संबंधित मध्य प्रशांत महासागरातील ‘निनो 3.4’ या प्रदेशातील समुद्रपृष्ठाच्या तापमानातील विसंगती सामान्य तापमानापेक्षा 3.4 अंश सेल्सिअसने अधिक असल्याचा दावा त्यांनी केला आहे. हा आकडा यापूर्वीच्या एल निनो घटनांच्या तुलनेत अभूतपूर्व असल्याचे त्यांनी नमूद केले.
Mumbai Heat Wave – मुंबईत उष्णतेची लाट, पारा 38 अंशांवर; उकाड्याने नागरिक हैराण
दुसरीकडे जागतिक हवामान संघटनेने ऑक्टोबर ते डिसेंबर 2026 या कालावधीत मध्य आणि पूर्व उष्णकटिबंधीय प्रशांत महासागरातील समुद्रपृष्ठाचे तापमान सामान्यपेक्षा तब्बल 3.7 अंश सेल्सिअसने अधिक होण्याचा अंदाज व्यक्त केल्याचे वृत्तात नमूद आहे. ही वाढ प्रत्यक्षात नोंदवली गेल्यास ती अत्यंत असामान्य ठरू शकते. हवामानतज्ज्ञ लिऑन सिमन्स यांनी या संभाव्य तीव्रतेचे वर्णन ‘सुपर-डुपर एल निनो’ असे केले आहे.

























































