ट्रकला धडकल्यानंतर बसला भीषण आग; 28 प्रवाशांचा होरपळून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ट्रक वाहून नेणाऱ्या ट्रकला धडकल्यानंतर प्रवासी बसला भीषण आग लागली. यात 28 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. टांझानियातील मोरोगोरो-दार एस सलाम महामार्गावरील म्कंबारानी येथे हा अपघात झाला. ट्रक इतर वाहनांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, बस दार एस सलामहून म्बेया (Mbeya) येथे चालली होती. यादरम्यान, इरिंगा (Iringa) येथून दार एस सलामच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकशी म्कंबारानी येथे तिची ट्रकशी धडक झाली, असे अग्निशमन व बचाव दलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. आगीत बस जळून खाक झाली. जखमींची संख्या अद्याप समजू शकली नाही. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.