न्यूझीलंड दौऱ्याच्या तयारीसाठी रवींद्र जाडेजा रणजी ट्रॉफी खेळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानचा क्रिकेट संघ न्यूझीलंडमध्ये कसोटी मालिका खेळणार आहे. आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टीने ही मालिका हिंदुस्थानसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. रवींद्र जाडेजाची या मालिकेसाठी निवड निश्चित आहे. जाडेजाला याची जाणीव असून त्याने तयारीसाठी रणजी ट्रॉफी खेळण्याचे ठरवले आहे. 11 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या छत्तीसगडविरुद्धच्या पहिल्या रणजी ट्रॉफी सामन्यासाठी त्याची सौराष्ट्र संघात निवड झाली आहे. संघाचे कर्णधारपद जयदेव उनाडकटकडे सोपवण्यात आले आहे.

जडेजा नुकत्याच वेस्ट इंडीजविरुद्ध झालेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत हिंदुस्थानी संघाचा भाग होता. तो दोन सामन्यांमध्ये खेळला.

सौराष्ट्र क्रिकेट संघः  जयदेव उनाडकट (कर्णधार), रवींद्र जाडेजा, हर्विक देसाई (यष्टिरक्षक), अर्पित वसावडा, चिराग जानी, प्रेरक मांकड, जय गोहिल, चेतन साकरिया, अंपुल पनवार, समर गुर्जर, पार्थ भुई, विश्वराज सिंग जडेजा, हेत्विक कोटक, नील पंडय़ा, अर्थ यादव, तरंग गोहेल.