जंतरमंतरवर उद्या परत येणार, आंदोलन थांबणार नाही; सीजेपीच्या अजिंक्य शिंदे यांचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्ली पोलिसांनी अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दास यांना ताब्यात घेतलं असलं तरी आंदोलन थांबणार नाही. जंतरमंतरवर उद्या परत येणार, असा इशारा सीजेपीने दिला आहे. दिल्लीत आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर सीजेपीची मुंबईत पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत सीजेपीचे अजिंक्य शिंदे यांनी माध्यमांना माहिती दिली. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अभिजीत दीपके यांनी जारी केलेल्या व्हीडिओ संदेशमधून पुढील आंदोलनाची जबाबदारी अजिंक्य शिंदेवर असेल, जाहीर केले. यानंतर मुंबई सीजेपीची ही पत्रकार परिषद झाली.

अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दास या तिघांचा आमच्याशी ८ तास होऊन गेले अद्याप संपर्क नाही. मात्र, पोलिसांनी बळाचा वापर केला असला तरीही कोणत्याही स्थितीत आम्ही माघार घेणार नाही. आम्ही पुन्हा एकदा जंतरमंतरकडे जाणार आहोत. आणि ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही, असे अजिंक्य शिंदे यांनी सांगितले.

गेल्यावेळी जंतरमंतरवर संपूर्ण देश एकवटला होता. त्यावेळी एकजूट दाखवून देशाने मोदी-शहांच्या हुमकूमशाही सरकारच्या अहंकार चक्काचूर केला होता. यामुळे हे सरकार घाबरलं होतं. त्यांनी बस, ट्रेन रोखल्या. जे दिल्लीत येणार होते त्यांना रोखलं. जिथे ट्रेन थांबल्या त्या ट्रेनमधून उतरवून आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं. देशातलं हुकूमशाही सरकार घाबरलं आहे. हा आमच्या आंदोलनाचा अर्धा विजय आहे. सरकारला वाटत असेल की यांना ताब्यात घेतल्यानंतर आंदोलन आजच संपेल. पण आंदोलनाची ही नवी सुरुवात आहे. ज्ञानेश कुमार राजीनामा देत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील.

७००० आंदोलक पोलिसांच्या ताब्यात

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार दिल्लीत पोलिसांनी ७००० आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. तसेच पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी आंदोलकांवर एफआयआर दाखल केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.