भाजप पदाधिकाऱ्याची सुपरवायझरला मारहाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कल्याणच्या उंबर्डे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या पाहणी दौऱ्यात भाजप पदाधिकाऱ्याने सुपरवायझरला मारहाण केली. मशिनरी बंद आणि कर्मचाऱ्यांकडे ओळखपत्रे नसल्याचा आरोप करत आमदार सुलभा गायकवाड आणि केडीएमसीचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्यासमोरच कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याने प्रकल्पस्थळी काही काळ तणाव निर्माण झाला.

कोट्यवधींचे टेंडर देऊनही प्रकल्पात अपेक्षित काम होत नसल्याचा भाजप पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे. याच कारणावरून पाहणी दौऱ्यात भाजपचे पदाधिकारी विजय जोशी यांनी सुपरवायझरला कॉलर पकडून मारहाण केली. दरम्यान प्रकल्पातील मशिनरी सुरू असल्याचे सांगत उपायुक्त रामदास कोकरे यांनी भाजप पदाधिकाऱ्यांचे आरोप फेटाळून लावले.