
‘सीजेपी’चे (CJP) सह-संस्थापक आशुतोष रांका आणि प्रवक्ता सौरव दास यांना दिल्ली पोलिसांनी पुन्हा एकदा ताब्यात घेतले आहे. या दोघांना नेमक्या कोणत्या कारणावरून ताब्यात घेण्यात आले आहे, याबाबत पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची माहिती दिलेली नाही.
‘सीजेपी’चे (CJP) सह-संस्थापक आशुतोष रांका आणि प्रवक्ता सौरव दास यांना दिल्ली पोलिसांनी पुन्हा एकदा ताब्यात घेतले आहे. https://t.co/VrU5UuaLdL
— Saamana Online (@SaamanaOnline) October 13, 2026
मिळालेल्या माहितीनुसार, सौरव दास हे आपल्या काही सहकाऱ्यांसह राजधानी दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात आले होते. त्यावेळी पोलिसांनी कारवाई करत त्यांना रोखले आणि लगेचच ताब्यात घेतले. सौरव दास यांच्यासोबत ‘सीजेपी’चे सह-संयोजक आशुतोष रांका यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.




























































