होर्मुझमधील तेलवाहू जहाजांवर हल्ला; दोन हिंदुस्थानी खलाशी बेपत्ता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

होर्मुझ सामुद्रधुनीजवळ रविवारी पुन्हा एकदा तेलवाहू जहाजांवर भीषण क्षेपणास्त्र हल्ला झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यामुळे सामुद्रधुनी क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. हल्ल्यादरम्यान जहाजांवर 11 खलाशी होते. त्याकैकी दोन हिंदुस्थानी खलाशी बेपत्ता झाले असून इतर खलाशी सुखरूप आहेत.

11 ऑक्टोबर रोजी ओमानमधील सोहार अँकरजवळ दोन तेलवाहू जहाजांवर ड्रोन हल्ला झाला. त्यात एमटी पेट्रो डॉल्फिन व ‘एमटी व्हॅलथेरा’ या मार्शल आयलंड्सचा ध्वज असलेल्या दोन तेलवाहू जहाजांचा समावेश आहे. हल्ल्यादरम्यान एमटी पेट्रो डॉल्फिन जहाजावर 11 भारतीय खलाशी होते. त्याकैकी नऊ जणांची सुटका करण्यात आली असून दोन खलाशी बेपत्ता आहेत, तर या हल्ल्यात ‘एमटी व्हॅलथेरा’ जहाजावर मोठी आग लागली. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.