
मुंबई पालिकेच्या आरोग्य सेवांमध्ये खासगी भागीदारी वाढवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पालिकेने आपली रुग्णालये आणि आरोग्य सेवा पीपीपी मॉडेलवर विकसित करण्याची आणि चालवण्याची योजना आहे. त्यासाठी सेवा पुरवठा संस्थांची निवड करण्यासाठी सल्लागार कंपनीला महिना पावणेचार लाख रुपये देण्यात येणार आहेत.
या कामासाठी वृत्तपत्रांत सार्वजनिक निविदा न काढता राज्य सरकारच्या पॅनेलवरील केपीएमजी अॅडव्हायझरी सर्विसेस प्रा.लि. कंपनीची थेट निवड करण्यात आली आहे. या कंपनीला दर महिन्याला 3 लाख 45 हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. 12 महिन्यांच्या या संपूर्ण पंत्राटाचे मूल्य 41,40,000 रुपये इतके आहे. या प्रस्तावास आता स्थायी समितीची कार्योत्तर मंजुरी मिळवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.



























































