हा कायदा आणि सुव्यवस्थेचा विषय, माझा नाही – सरन्यायाधीश सूर्य कांत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकसभा आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी व मल्लिकार्जुन खरगे यांना भेट नाकारण्याच्या मुद्द्यावरून सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या स्थापनेला 33 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांनी न्या. सूर्य कांत यांना भेट नाकारण्याबाबत विचारले होते. त्यावर हा माझा मुद्दा नसून कायदा आणि सुव्यवस्थेचा विषय आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांचे पत्र मला काल प्राप्त झाले. त्यावर मी उत्तर दिले आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांना भेट नाकारण्यामागील कारणे त्यांना दिलेल्या पत्रात नमूद केली असून त्या कारणांमुळे मी त्यांना चर्चेसाठी भेटू शकत नाही, असे न्या. सूर्य कांत म्हणाले. देशाच्या प्रत्येक नागरिकाला आमच्यापर्यंत पोहोचण्याचा अधिकार आहे. कायद्याच्या चौकटीतच प्रत्येकाचे म्हणणे ऐकले जाईल, असेही सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले. मात्र विरोधकांनी सर्वोच्च न्यायालयावर काढलेल्या मोर्चाबाबत टिप्पणी करण्यास त्यांनी नकार दिला.

माणसांसाठी आणि मानवतेसाठी न्याय मागण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. न्याय मिळवणे हाच आंदोलनाचा मुख्य हेतू आहे. आम्ही माणुसकीच्या नात्याने न्यायाची मागणी करत आहोत. आम्हाला न्याय हवा आहे.