रणजी राऊंडअप – महाराष्ट्राच्या 333 धावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्राने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत सर्व्हिसेसविरुद्ध पहिल्या डावात 110.1 षटकांत 333 धावसंख्या उभारली. दुसऱ्या दिवसाच्या खेळात महाराष्ट्राचा डाव संपुष्टात आला. त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या सर्व्हिसेसला उर्वरित 28 षटकांत खेळात एका गडयाच्या मोबदल्यात 74 धावाच करता आल्या. त्यामुळे सर्व्हिसेस अजूनही 259 धावांनी पिछाडीवर असून, सामन्यावर महाराष्ट्राची पकड कायम आहे. महाराष्ट्राच्या डावात कर्णधार पृथ्वी शॉने 70 धावांची आक्रमक खेळी केली, तर अंकित बावणेने 118 धावा झळकावल्या. 1

घरामी–पोरेलची शतके

n दिल्लीचा पहिला डाव 240 धावांत आटोपल्यानंतर बंगालच्या फलंदाजांनी दुसऱ्या दिवशी सामन्यावर पकड मिळवली. सुदीप कुमार घरामीने 170 चेंडूंत शतक झळकावले. त्याचे हे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील दहावे शतक ठरले. अभिषेक पोरेलनेही शतक पूर्ण करत बंगालची आघाडी भक्कम केली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी महत्त्वपूर्ण भागीदारी केली. मोहम्मद शमीने पहिल्या डावात दिल्लीचे चार विकेट घेतले होते. मात्र बंगालच्या फलंदाजांनी दुसऱ्या दिवशी धावांचा ओघ कायम ठेवला. दिवसाचा खेळ थांबला तेव्हा बंगालची धावसंख्या 33 बाद होती. दिल्लीवरील आघाडी 64 धावांपर्यंत पोहोचली होती.

झारखंडचा धावांचा डोंगर

n काल 5 बाद 289 धावा करणाऱ्या झारखंडने दुसऱ्या दिवशीही 288 धावा करत आपल्या धावांचा टप्पा 587 वर नेला. आज त्यांच्या डावात विराट सिंह (108) आणि आदित्य सिंह (147) यांनी सहाव्या विकेटसाठी 227 धावांची भागी रचत संघाला पाचशेचा टप्पा गाठून दिला. केरळमकडून वैशाख चंद्रनने 166 धावांत 5 विकेट टिपल्या.

जाडेजाचे 16वे प्रथम श्रेणी शतक

n रवींद्र जाडेजाने सौराष्ट्राकडून खेळताना छत्तीसगडविरुद्ध 102 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. हे त्याचे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील 16 वे शतक ठरले. प्रेरक मंकडनेही 129 धावा फटकावत संघाच्या धावसंख्येत मोठी भर घातली. या दोघांच्या फलंदाजीमुळे सौराष्ट्राने पहिल्या डावात 392 धावा उभारल्या. छत्तीसगडकडून देव आदित्य सिंहने सहा विकेट घेत प्रभावी गोलंदाजी केली. दुसऱ्या दिवसअखेर छत्तीसगडने 3 बाद 122 धावा केल्या होत्या.

जम्मू–कश्मीर 120 वर गारद

n मध्य प्रदेशचा डाव 196 धावांत गुंडाळणाऱ्या रणजी विजेत्या जम्मू- कश्मीरचा पहिला डाव आवेश खान आणि आर्यन पांडे यांनी 120 धावांत संपवत 76 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. मात्र त्यानंतर जम्मू-कश्मीरच्या आकिब नबी आणि सुनील कुमारने चार धक्के देत मध्य प्रदेशची 4 बाद 59 अशी अवस्था करत सामन्याला आणखी रंगतदार केले. आता मध्य प्रदेशची आघाडी 135 इतकी झाली आहे.

आंध्रची आघाडी

n कर्नाटकचा डाव 274 धावांवर संपवणाऱ्या आंध्र प्रदेशने श्रीराम राहुल (ना. 108) आणि रेवंथ रेड्डी (97)यांनी सहाव्या विकेटसाठी केलेल्या 202 धावांच्या भागीच्या जोरावर दुसऱ्या दिवसअखेर 6 बाद 331 अशी दमदार मजल मारली आणि पहिल्या डावात 57 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली.