उड्डाणपुलांच्या दुरुस्तीचा खर्च 16 कोटींनी वाढला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पूर्व द्रुतगती महामार्गावरील सांताक्रूझ चेंबूर लिंक रोडवरील (एससीएलआर) तीन उड्डाणपूल आणि स्वामीनारायण उड्डाणपुलाच्या दुरुस्ती खर्चात तब्बल 16 कोटी 26 लाख रुपयांनी वाढ झाली आहे. पुलांचे मजबुतीकरण, संरचनात्मक दुरुस्ती तसेच बेअरिंगची दुरुस्ती करण्याच्या कामात फेरफार झाल्याने मूळ 31 कोटी 76 लाखांचा खर्च आता 48 कोटी 3 लाखांवर पोचला आहे. दुरुस्तीचा खर्च वाढत असताना  अवघ्या 14 वर्षांत एससीएलआरवरील उड्डाणपुलांची दुरवस्था झाल्याने त्यांच्या देखभाल दुरुस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.