
राज्य सरकारने आज तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. डॉ. मंजिरी मनोलकर, शुभम गुप्ता आणि डॉ. भालचंद्र चव्हाण यांना नव्या पदांवर नियुक्त करण्यात आले आहे. सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ, पुणेच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. मंजिरी मनोलकर यांची व्यवस्थापकीय संचालक, पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ, पुणे या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे तर पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ, पुणे चे व्यवस्थापकीय संचालक शुभम गुप्ता यांची सदस्य सचिव, उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळ, मुंबई या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे तर डॉ. भालचंद्र चव्हाण यांची बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते यापूर्वी मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागात संचालक म्हणून कार्यरत होते.

























































